Santosh Deshmukh Murder Case – वाल्मीक कराडवर मकोका लावल्यानंतर धनंजय देशमुख SIT प्रमुखांना भेटले; सुरेश धस, अंजली दमानियांनीही दिली प्रतिक्रिया

वाल्मीक कराडचा ताबा एसआयटीकडे देण्यात आला आहे. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्डीम कराडचा ताबा हा आधी सीआयडीकडे होता. मात्र आता वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता एसआयटीकडे वाल्मीक कराडचा ताबा असणार आहे. एसआयटी उद्या वाल्मीक कराडला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहे. या पार्श्वभूमीवर संरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एसआयटीची प्रमुख तेलीसाहेब यांना आम्ही भेटलो. तपासासंदर्भात आम्ही बोललो. तपास योग्य चालू आहे. तपास असाच योग्य दिशेने चालू राहील, असे तेलीसाहेबांनी सांगितले. अजूनह सगळा तपासून होणं बाकी आहे. फरार आरोपीलाही लवकरच अटक होईल, असं पोलिसांनी सांगितलं होतं. सीआयडी आणि पोलीस यंत्रणेचं काम सुरू आहे. पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आमची एक मागणी कायम आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे सगळे असतील ज्यांनी हे कट कारस्थान केलं. संघटीत गुन्हेगारीला बळ दिला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तपास योग्य दिशेने होत आहे, असा विश्वास आम्हाला पोलिसांनी दिल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

मोठी बातमी: वाल्मीक कराडवर मकोका, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात एकालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. एसआयटीने त्यांचे काम दाखवले. कुणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. पोलीस यंत्रणा आणि एसआयटी काम करत आहे. त्यांनी जी कडी जोडली आहे त्यानुसार कारवाई झाली. जिथे जिथे कडी जोडली जाईल तिथपर्यंत कारवाई केली जाईल, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले.

वाल्मिक कराडला घेऊन जाऊन त्यांच्यावर मकोका लावून मकोका कोर्टापुढे सादर करण्यात येत आहे. ते ऐकून थोडं बरं वाटलं. आता गाडी कुठेतरी रुळावर येईल. आणि जी तपासाची दिशा आहे ती आता कुठे योग्य दिशेला जाईल, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.