बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज आज 22 दिवस झाले आहेत. असं असलं तरी अद्यापही काही आरोपीना अटक करण्यात आलेली नाही. यावरूनच आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
तुम्ही (महायुती सरकार) दाऊदला फरफटत आणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. ते म्हणाले आहेत की, तुम्ही वाल्या कराडला आणू शकत नाही, तुम्ही दाऊदपर्यंत काय पोहोचणार. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले.
वाल्मिकी कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार. त्याला अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलं नाही. याच मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ”पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असल्या शिवाय हे सगळं घडत नाही. अजूनपर्यंत मी खुणांची मालिका सांगितली आहे. त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलावलं नाही.”