Santosh Deshmukh Case : ‘मकोका’ची कारवाई करताना मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? रोहित पवारांचा सरकारला सवाल

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र मुख्य आरोपी वाल्मीकी कराडवर मोकोका लावण्यात आलेला नाही. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. मकोकाची कारवाई करताना मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. X वर पोस्ट करत त्यांनी हा सवाल विचारला आहे.

X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, ”संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याची सरकारची कारवाई स्वागतार्ह आहे. यामुळं निर्घृणपणे कुणाचाही जीव घेण्याच्या प्रकाराला काही प्रमाणात चाप लागण्यास मदत होईल. मात्र खून आणि मकोकाची कारवाई करताना यातून मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, अन्यथा लोकच त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.”