प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पाठराखण करणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पिताना दिसत आहेत. शरण आलेला आरोपी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे म्हणतो. सरकारने या आरोपीला पाठबळ दिले आहे का? असा संतप्त सवाल करतानाच दगाफटका केला तर याद राखा, संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

बीड जिह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी आज आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही वाल्मीक कराडच्या शरणागतीवर संताप व्यक्त केला.