अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही कायम तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. नुकतच तिने एक नवीन हेअर कट केला आहे. संस्कृतीने आपल्या या नव्या लुकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने बोल्ड अंदाजात ह फोटोशूट केले आहे. त्यामुळे चाहत्यांची तिच्यावरून नजर हटेनाशी झाली आहे.
संस्कृतीने काळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपसह डेनिम जीन्स परिधान केली आहे.
हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने ब्रॉड आयलायनर, गुलाबी हलकासा ब्लश, न्यूड गुलाबी लिपस्टिक या सगळ्या मेकअपचा वापर केला असून सोबतच गळ्याभवती एक नाजुकशी चैन घातली आहे.
या बोल्ड अंदाजातील फोटोशूटसाठी संस्कृतीने हटके पोज दिल्या आहेत.
या बोल्ड फोटोशूटला संस्कृतीने ‘I Know You You Love Me!’ असे कॅप्शन दिले आहे.