सानपाड्यातील डीमार्टजवळ गोळीबार, एक जण जखमी; आरोपी फरार

नवी मुंबईतील सानपाड्यात डीमार्ट जवळ बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. भर दिवसा झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.