जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान देशात वाढती गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था, सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये 94 टक्के वाढ झाल्याचं, ते राज्यसभेत म्हणाले आहेत.

राज्यसभेत बोलताना संजय सिंह म्हणाले की, “संपूर्ण जग अंतराळ वाटचाल करत आहे, तंत्रज्ञानात प्रगती करत आहेत. पण तुम्ही (भाजप सरकार) कबरी खोदण्यात व्यग्र आहात. तुम्ही मशिदीच्या आत मंदिर खोदण्यात व्यस्त आहात.”

ते म्हणाले, “जर तुम्हाला मुघलांचा इतिहास शिकवायचा असेल तर तो शिकवा. पण गृहमंत्री इथे बसले आहेत, मला विचारायचे आहे की, एएसआय संरक्षित संस्था आणि मालमत्ता तुमच्या संरक्षणाखाली आहेत. मग ते ताजमहाल असो किंवा लाल किल्ला. तुमचेच लोक म्हणतात की. आम्ही ते तोडून टाकू, खोदू आणि नष्ट करू.” संजय सिंह म्हणाले की, “चला ताजमहाल पाडूया, लाल किल्ला पाडूया, ब्रिटीशांनी बांधलेले दिल्ली रेल्वे स्टेशन पाडूया. ते म्हणाले, चला देशभर खोदकाम करूया. देशभरातील सर्व रस्ते खोदू आणि सर्व पूल पाडून टाकू.”

संजय सिंह म्हणाले, “जर तुम्हाला देशभरात इतिहास शिकवायचा असेल तर महारांचा इतिहास शिकवा. दलितांना तलावातून पाणी पिण्याची परवानगी नव्हती. कोणत्या मुस्लिमाने म्हटले होते की, दलितांना समोर भांडे बांधून चालावे लागेल. आमच्या शेजारी बसून दलित जेवू शकत नाही, हे कोणत्या मुस्लिमाने म्हटले होते. प्राणी तलावाचे पाणी पिऊ शकतात पण दलित नाही, हेही कोणत्या मुस्लिमाने म्हटले होते.”