आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तुरुंगात 8 किलो वजन कमी झाले आहे. भाजप केजरीवाल यांच्या जीवाशी खेळ करत आहे, असा आरोप संजय सिंह यांनी केला.
अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जास्तीत जास्त त्रास द्यायचा आणि त्यांच्या जीवाचा खेळ करायचा हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. केजरीवाल यांना एखादा गंभीर आजार व्हावा किंवा तुरुंगातच त्यांच्या जीवाचे काहीतरी बरेवाईट व्हावे याचे षडयंत्र भाजप आणि केंद्र सरकार रचत आहे, असा आरोपही सिंह यांनी केला.
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली. त्यावेळी त्यांचे वजन 70 किलो होते. मात्र तुरुंगातील काळात त्यांचे वजन साडे आठ किलोने कमी होऊन 61.5 किलोवर आले. वजन एवढे कसे कमी झाले याची गांभीर्याने तपासणीही होत नाही, असा दावाही त्यांनी केला.
ED के मामले में व्यक्ति को जमानत तभी मिलती है, जब अदालत को लगता है कि व्यक्ति निर्दोष है। अरविंद केजरीवाल जी को भी कोर्ट ने जमानत दी और यह मानकर दी कि वह निर्दोष हैं।
सुप्रीम कोर्ट ने भी अपने फ़ैसले में कहा है कि पूछताछ का मतलब यह नहीं है कि पूछताछ के लिए आप किसी को भी… pic.twitter.com/bEY0MIgSN7
— AAP (@AamAadmiParty) July 13, 2024
एवढेच नाही तर पाच वेळा केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी 50 पर्यंत खाली आली होती. जर झोपेत असताना साखरेची पातळी कमी झाली तर रुग्ण कोमात जा शकतो, असे सिंह म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांना ईडी खटल्यात अंतरिम जामीन; सीबीआय केसमध्ये तूर्त तुरुंगातच