Delhi Assembly Election: दिल्ली पोलीस भाजपला निवडणूक लढवण्यास मदत करत आहेत, संजय सिंह यांचा आरोप

दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. येथे 70 विधानसभा जागांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झालं आहे. मतदानादरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी दिल्ली पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. दिल्ली पोलीस भाजपला निवडणूक लढवण्यास मदत करत आहेत, असा आरोप संजय सिंह म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय सिंह?

माध्यमांशी संवाद साधताना संजय सिंह म्हणाले की, “पोलिसांनी काल संध्याकाळी करावल नगर येथील माजी नगरसेवक उमेदवार वीरेंद्र गुप्ता फौजी यांना पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्यांना अद्याप सोडलेले नाही. दिल्ली पोलीस भाजपला निवडणूक लढवण्यास मदत करत आहेत.”

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय सिंह म्हणाले, ”दिल्लीत वाल्मिकी समुदायाच्या लोकांना लक्ष्य करून वाल्मिकी समुदायाच्या नेत्यांना अटक केली जात आहे. वाल्मिकी चौपालचे प्रमुख उदय गिल यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. हरीश यांना साउथ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.”

ते म्हणाले, ”मी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला विचारतो की, तुम्ही वाल्मिकी समुदायाप्रती शत्रुत्व का दाखवत आहात?’ तुम्ही त्यांना लक्ष्य करून अटक करत आहात. तुम्ही वाल्मिकी समाजातील किती लोकांना अटक केली आहे? आणि वाल्मिकी समाजाचे लोक त्यांच्या मताच्या बळावर या अपमानाचा आणि या गुंडगिरीचा बदला घेतील.”