
मुंबईतील वरळी भागामध्ये मिंधे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने भरधाव कारने नाखवा दाम्पत्याला उडवले. यात कावेरी नाखवा यांचे मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले. नाखवा कुटुंबीय आरोपी मुलाला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री आम्ही 10 लाखांची मदत दिल्याची टीमकी वाजवत आहेत, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर मौन बाळगून आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा समाचार घेतला.
गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत आरोपी व त्याच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत या 10 लाखांना किंमत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखांचा आहे का? असा सवाल करत ते पुढे म्हणाले की, असे काही झाले की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतात. या काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे की खोकेवाले आहेत? काही झाले की याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा अन् पैसे दिले.. पैसे दिले… म्हणत फिरायला मोकळे. पण तुमच्या पैशाची मस्ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, हे शिंदे-फडणवीस यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा राऊत यांनी दिला.
राज्यात कायदा व सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झालेली आहे. चिरडून मरतेय. राज्याचे गृहमंत्री यूजलेस आहेत. मुंबईच्या रस्त्यावर इतकी मोठी दुर्घटना घडली, पण गृहमंत्र्यांकडून साधी संवेदना नाही. अशा प्रकारचे गृहमंत्री राज्याला मिळाले हे दुर्दैव आहे. गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? ते स्वत:ची जबाबदारी, कर्तव्य पार पाडताहेत की नाही? मुंबईच्या रस्त्यावर एक मराठी महिला चिरडून मारली जाते. तिच्या किंकाळ्या, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.
मिहीर शहा ‘राक्षस’! या खुन्याला कोळीवाडय़ात भरचौकात सोडा!! आदित्य ठाकरे यांचा संताप
ते पुढे म्हणाले की, मिंधे सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे काय कायदेशीर आणि बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. वरळी हिट अॅण्ड रनचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही करणार असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
View this post on Instagram
यावेळी त्यांनी पैशाचे राजकारण करणाऱ्या मिंधे सरकारला चांगलेच फटकारले. अपघात झाला 10 लाख दिले… चेंगराचेंगरी झाली 5-5 लाख दिले… खून झाले पैसे दिले. हे पैशाचे राजकारण चाललं आहे का? कावेरी नाखवा यांना एकनाथ शिंदेंच्या खास माणसाने कारखाली चिरडले. त्यांचा मृत्यू झाला. ती लाडकी बहीण नाही का? गृहमंत्री कुठे आहेत? ते गप्प का आहेत? अशा सवालांच्या फैरी राऊत यांनी डागल्या.
आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे खास असल्याने फडणवीस गप्प आहेत का? प्रदीप नाखवा यांचा संतप्त सवाल