
”कोण आहेत हे विखे पाटील. घाबरून ज्यांनी दहा वेळा पक्ष सोडला. दहा वेळा साड्या बदलणारे हे लोक आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समाचार घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
”कोण विखे पाटील. ज्यांनी घाबरून दहा वेळा पक्ष सोडून गेले. या विखे पाटलांना व त्यांच्या वडिलांना पहिलं मंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी दिलंय. दहा वेळा साड्या बदलणारे हे लोक आहेत. यांनी आपल्याला शिकवू नये. आपण मातोश्रीवर येत होतात. शिवसेनेने, काँग्रेसने तुम्हाला सर्व काही दिलं. ज्या शिवसेनेने तुम्हाला मान प्राण प्रतिष्ठा दिली त्यांच्याबद्दल तुम्ही असं वक्तव्य करता हा निर्लज्जपणा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी विखे पाटलांवर टीका केली.