
कुडाळमध्ये सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर या 35 वर्षीय तरुणाचे अपहरण करून अमानुष हत्या झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
”सिंधुदुर्ग कोकणात अनेक शिवसैनिकांचे खून झाले. रमेश गोयेकरची हत्या झाली. त्यावर सीबीआयची चौकशी लावण्यात आली. पण ती देखील मॅनेज झालं. नारायण राणेंच्या निवडणूकीच्या वेळी रमेश गोयेकरचं अपहरण झालं व नंतर त्याची हत्या झाली. मृतदेह देखील गायब केला. सत्यजित भिसेचा खून झाला. असे अनेक खून झाले. उकरायचं म्हटलं तर अनेकांचे हातपाय तोडले, अनेकांना गोळ्या घातल्या. श्रीधर नाईकचा खून केला. ते तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष होते. या सर्व खूनांची मोठी परंपरा आहे. बीडमध्ये संतोष देशमुखचा खून पचला नाही व अचानक सगळ्या खूनांना वाचा फुटली. तसंच सिंधुदुर्गात देखील होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.