कंगना राणावत यांना राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं, संजय राऊत यांचा टोला

”कंगना रानावत यांनी मुख्यमंत्र्यांचा स्यूट मागणंच मुळात मूर्खपणाचं आहे. पण श्रीमती कंगना जी इतक्या मोठ्या आहेत की त्यांनी राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं, असा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप खासदार कंगना रानावत यांना लगावला आहे.

”नवीन खासदार जेव्हा दिल्लीत निवडून जातात. तेव्हा ते ज्या राज्यातून निवडून जातात तेव्हा त्या राज्याच्या सदनात त्या खासदाराची व्यवस्था केली जाते. काल आमचे खासदार दिल्लीत गेले ते महाराष्ट्र सदनात राहिले. त्यांना तिथे प्रत्येकाला एक रुम देण्यात आला. कंगना रानावत नावाच्या ज्या श्रीमतीजी आहेत त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा स्यूट मागावा हा विनोद आहे. कायद्याने त्यांची सोय हिमाचल प्रदेशच्या सदनात व्हायला हवी होती. तिथल्या मुख्यमंत्र्यांना त्यांचा स्यूट द्यायचा असेल तर आमचा त्यावर काही आक्षेप नाही. जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा स्यूट द्यायचाच असेल तर महाराष्ट्रातील वरिष्ट खासदार आहेत, जाय़ंट किलर आहेत त्यांना द्या अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचा स्यूट मागणं हे मुर्खपणाचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

उज्ज्वल निकम यांच्यांबाबत विचारल्यावर संजय राऊत यांनी निकम यांना एक आवाहन केले आहे. ”उज्वल निकम हे मोठे वकील आहे. पण त्यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनी स्वत:वर एक शिक्का मारून घेतला. आता त्यांना या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल. जर त्यांना हा शिक्का पुसायचा असेल तर त्यांनी जाहीर करावं की मला जोरजबरदस्ती करून निवडणूक लढायला लावली. किंवा जसं मी कसाबला फासावर लटकवलं तसंया निवडणूकीत मला लटकवलं गेलं असं सांगावं. त्याशिवाय त्यांना भाजप संघाचा शिक्का पुसता येणार नाही, असे आवाहन संजय राऊत यांनी उज्ज्व निकम यांना केले आहे.

”लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाबाबत आमच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. लोकशाहीत लोकसभेच्या अध्यक्षपदाचे खूप महत्त्व आहे. खरतंर अध्यक्ष हा लोकशाहीचा रखवलदार असतो. तिथे अशी व्यक्ती बसायला हवी जी सर्वांना समान न्याय देईल. पण गेल्या दहा वर्षात ज्या प्रकारची लोकं तिथे बसली त्यामुळे असं काही झालं नाही. आता एक मजबूत विरोधी पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षासोबत चर्चा करयला हवी. उपाध्यक्षाचे पद विरोधीपक्षाला मिळायला हवे. ”, असं संजय राऊत म्हणाले.

या ड्रग्जचा पैसा राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला जातोय?

पुणे आणि नाशिक दोन शहरं ड्रग्जच्या विळख्यात गेली आहेत. हे सर्व कुठून येतय? गुजरातमधुन येतंय हे सिद्ध झालंय. हजारो कोटींचं ड्रग्ज तिथे उतरतंय. हे सगळं करणारे कोण आहेत? यांना राजकीय संरक्षण कुणाचं आहे? हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेला? पुण्याचे लोकप्रतिनीधी पालकमंत्री कोण होते याचा तपास होणं गरजेचं आहे. पुणे संस्कार संस्कृतीचं केंद्र होतं. पुणे गुन्हेगारी व अमली पदार्थांचं केंद्र होत असेल त्याला जबाबदार असतात. चंद्रकांत पाटील काहीही म्हणू देत पण त्यांना अशी जबाबदारी झटकता येत नाही, असे संजय राऊत म्हणाले.