विधानसभा निवडणुका झाल्यावर महायुतीतील ‘नकली’ वाघांची कातडी अन् मुखवटे ओरबाडून काढू! – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा नकली शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या जनतेने हिसका दाखवला होता. आता विधानभा निवडणुका झाल्यावर महायुतीतील नकली वाघांची कातडी आणि मुखवडे ओरबाडून काढू, अशा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत जनतेने झिडकारल्याने सैरभैर झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना साद घातली होती. मात्र ‘नकली वाघ महायुतीत असून असली वाघ आमच्यासोबत आहेत’, असा टोला जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. याबाबत दिल्लीत पत्रकारांनी विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, “जयंत पाटील बरोबर बोलले आहेत. महायुतीमध्ये स्वत:ला वाघ समजणारे कोल्हे, लांगडे आहेत. त्यांना मोदी-शहांनी वाघाचे कातडे पुरवल्याने ते डरकाळ्या मारत फिरताहेत. पण नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर त्यांती कातडी आणि मुखवटे ओरबाडून काढू.”

फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण खराब केले

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेऊ नका अशा आशयाचे पत्र अजित पवारांना लिहिले होते. मात्र मंगळवारी अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर बोलावलेल्या बैठकीला नवाब मलिक हजर होते. यावरही राऊत यांनी भाष्य करत आता फडणवीस यांनी विरोध केला का? असा सवाल करत विधानपरिषद निवडणुकीत त्यांना एका मताची गरज असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्याबाबत फडणवीस यांचा व्यक्तीगत राग आहे. त्यामुळेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोकं शिंदे गट आणि भाजपमध्ये आहेत. त्याच्यावर फडणवीस कधी बोलणार? फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण बिघडवले असून राज्याची संस्कृती, सभ्यता याला त्यांनी काळीमा फासला. त्यांच्या हाती सूत्र आल्यापासून महाराष्ट्राचे नुकसान झाले. लोकसभेत आम्ही मोदींविरोधात लढाई लढली, आता विधानसभेत महाराष्ट्रात फडणवीस यांच्याविरोधात लढू व जनता त्यांना पराभूत करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

तिन्ही उमेदवार निवडून आणू

आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो असून विधानपरिषदेचा निकाल काय लागतोय हे लवकरच कळेल. या निवडणुकीत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव असे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आम्ही तिन्ही उमेदवार निवडून आणू, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

भाजपच्या हुकुमशाही, एकाधिकारशाहीवर राहुल गांधींचा लगाम; लोकसभा निवडणुकीतही घाम फोडला!- संजय राऊत

ही राज्य सरकारची जबाबदारी

अशा प्रकारचे सत्संग, आयोजनं यावर बंधणे असावीत. नवी मुंबईत खारघरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत चेंगराचेंगरी होऊन 40च्या वर माणसं भर उन्हात मेली. देशभरात असे सत्संग, धार्मिक सोहळे होतात, त्याच्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. हाथरस घटनेची जबाबदारी राज्यसरकारची आहे, असेही राऊत म्हणाले.

Hathras Stampede : गुप्तचर विभागात नोकरी, देवाचा दृष्टांत अन् सत्संग; हाथरस प्रकरणातील भोलेबाबा कोण आहेत?