उत्तर प्रदेशमध्ये दररोज 50 हजार गायींची कत्तल होत असल्याचा धक्कादायक दावा सत्ताधारी भाजपचेच आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केला आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. यावेळी त्यांनी जिथे जिथे भाजप सरकार आहे तिथे गोमांस निर्यातीतू पैसा खातायत व त्याच पैशाने निवडणूका लढतात, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.
”उत्तर प्रदेशात दररोज 50 हजार गायींची हत्या होतेय. आमदाराचा मी आभारी आहे. त्यांनी देशासमोर भाजपचा खरा चेहरा आणला. भाजला जो पैसा आला आहे तो गाय कापणाऱ्या कंपन्यांकडूनच आला आहे. आणि हे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणतात. जिथे जिथे भाजप सरकार आहे तिथे गोहत्या होतायत गोमांस निर्यात होतायत त्यातून पैसा खातायत भ्रष्टाचार करतायत व त्याच पैशाने निवडणूका लढत आहेत.आणि हे आम्हाला हिंदुत्वविरोधी म्हणतात.