ईव्हीएमने विजयी केल्यानंतरही मोदी व शहांचा महाराष्ट्रावरील आकस संपला नाही का? – संजय राऊत

यंदा राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यावरून त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व मिंधे गटावर टीका केली आहे.

”स्वत:ला शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न फडणवीस व भाजपला विचारावा. महाराष्ट्रासारख्या राज्याचा चित्ररथ का डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री व स्वत:ला शिवसेनाप्रमुख म्हणवून घेणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गेटवर उभं राहून विचारायला हवं. महाराष्ट्राने यांचं काय घोडं मारलं आहे. ईव्हीएमने विजयी केल्यानंतरही मोदी व शहांचा महाराष्ट्रावरील आकस संपला नाही का? महाराष्ट्र कलेच्या क्षेत्रात उच्च स्थानी आहे. देशाच्या राजपथावर आमच्या चित्ररथांनी क्रांती केली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारचा आहे. मग महाराष्ट्राचा का नाही? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.