Sanjay Raut On Mahakumbh चेंगराचेंगरी झाली तिथे तीस हजार कॅमेरे, त्याचे फुटेज का समोर आणत नाहीत; संजय राऊत यांचा सवाल

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) झालेल्या चेंगराचेंगरीवरून मोदी व योगी सरकारच्या ढोंगीपणावर जोरदार हल्लाबोल केला होता.  त्यानंतर उपसभापतींनी त्यांचा माईक बंद केला. बुधवारी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना देखील संजय राऊत यांनी मोदी व योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.  ”चेंगराचेंगरी झाली तिथे तीस हजार कॅमेरे, त्याचे फुटेज का समोर आणत नाहीत”, असा सवाल मोदी व योगी सरकारला केला आहे.

”संसदेत काल मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना महाकुंभविषयी बोललो. महाकुंभ आमच्याासाठी श्रद्धेचा विषय आहे. आम्ही भावनिकरित्या जोडलेलो आहोत. मी स्वत: कुंभमेळ्याला जाणार आहे. पण जी दुर्घटना घडली त्याला कुणीतरी जबाबदार आहे. जी चेंगराचेंगरी झाली त्याची कारण काय व नक्की कि्ती श्रद्धाळू मरण पावले हा माझा प्रश्न आहे. मी म्हणत नाही की त्या घटनेला सरकार किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही त्या दिवसापासून दोन ते अडीच हजार लोकं बेपत्ता आहेत. चार दिवसांपूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आली. लोकामंध्ये चर्चा आहे की दोन ठिकाणी जिथे चेंगरांचेंगरी झाली तिथे पंधराशे ते दोन हजार भाविक मृत्युमुखी पडले आहेत. जिथे घटना झाली तिथे तीस हजाराच्या वर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर त्याचे फुटेज का समोर आणत का नाही ? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

दोन हजार लोकं आजही त्या दिवसापासून बेपत्ता आहेत, त्याचं काय झालं.ती मरण पावली का? त्यांची प्रेतं सापडत नाहीत, त्यांची प्रेतं गायब केली का? असं मी विचारलं त्यानंतर सत्ताधारी बाकांवरून गोंधळ सुरू झाला. त्यानंतर उपसभापतींनी माझा माईक बंद केला. अखिलेश यादव व मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र मी बोलायला उभा राहिलो आणि माझा माईक बंद केला, त्यांनी मला बोलण्यापासून रोखलं हे योग्य नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

फडणवीसांच्या मालकांनी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची हिंमत दाखवावी

देवेंद्र फडणवीस म्हणतात की दिल्लीत आमची चार मतंही नाहीत. त्यांचं म्हणनं बरोबर आहे की ईव्हीएमची मतं नसतील पण बॅलेट पेपरवर मतदान घेतलं असतं तर आमची मतं किती आहेत ते तुम्हाला कळलं असतं. आमच्या ताब्यात ईव्हीएमची मालकी नसल्याने इकडच्या लोकशाहीचे आम्ही मालक नाहीत. त्यामुळे आमच्याकडे मतं नसतील. पण महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असो फडणवीसांच्या मालकांनी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची हिंमत दाखवावी मग दिल्लीत उत्तरप्रदेशमध्ये आमची किती मतं आहेत ते दाखून देऊन. महाराष्ट्राची तर बातच सोडा. इंडिया आघाडीचे दोन पक्ष इथे समोरासमोर लढत आहेत, मतदारांना ठरवू द्या की कुणाच्या बाजूने मतदान करायचं. पण मला खात्री आहे की मतदार केजरीवालांनी निवडून देतील, असे संजय राऊत म्हणाले.