चीनने गेल्याच महिन्यात होतान येथे दोन नव्या प्रांतांची घोषणा केली आहे. या प्रांतांचा काही भाग लडाखमध्ये येतो. दिवसेंदिवस लडाखमधील चीनची घुसखोरी वाढत चालली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ”लडाखमध्ये चीन आपली जमिन बळकावतोय आणि नरेंद्र मोदी अमित शहा बघत बसले आहेत. चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची हिंमत त्यांच्यात नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”चीनने लडाखमधील हिंदुस्थानच्या जमिनीवर कब्जा केलाय आणि नरेंद्र मोदी व अमित शहा बघत बसले आहेत. ते दिल्लीत निवडणूकीत व्यस्त आहेत. दिल्लीत आपवर हल्ले करत आहेत. आपवर हल्ले करण्यापेक्षा चीनला डोळे दाखवा दिल्लीतील निवडणूक महत्त्वाचं नाहीए. लडाखमधील ज्या जमिनीवर चीनने बळकवाली आहे. तुम्ही फक्त त्यांना पत्र लिहता. कश्मीरचे यांना नाव बदलायचे आहे. लडाख देखील कश्मीरचा हिस्सा आहे. 370 कलम काढल्यानंतर चीनमध्ये घुसखोरी का वाढल्या आहेत. त्यासाठी कोण जबाबदार आहे. लडाखमधील घुसखोरीबाबत प्रश्न केला तर त्याला उत्तर म्हणून ते कश्मीरचे आम्ही नाव बदलणार असं सांगतील. पण हे चीनला उत्तर नाहीए. चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही. भाजपला आम आदमी पार्टी एक आणिबाणी वाटते यांना मग लडाखमध्ये घुसलेला चीन आणिबाणी नाही का? प्रधानमंत्री का नाही बोलत त्यावर ही राष्ट्रीय सुरक्षेचा खूप मोठा मुद्दा आहे. सरकार याबाबत गंभीर नाहीए. , अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.