राज्यसभे शुक्रवारी विख्यात कायदेतज्ञ व काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनाखाली पन्नास हजार रुपयांचे बंडल सापडले. ते बंडल आपले नसल्याचा दावा सिंघवी यांनी केला. त्यानंतर या प्रकरणावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ”संसदेत गौतम अदानी, देशद्रोह्यांवर चर्चा होऊ दिली जात नाही. पण पन्नास हजाराच्या बंडलवरून भाजपची नौटंकी करते, गोंधळ घालते अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”काल राज्यसभेत जे पन्नास हजार रुपयांचे बंडल सापडले ते एक लॉस्ट एन्ड फाऊंडचे प्रकरण होते. माझं पाकिटही तिथे मी अनेकदा विसरलोय, नंतर ते मिळालंही. त्यावर एवढं डिबेट करायचं काही गरज नाही. तरिही त्यावर राजकारण केलं गेलं. संसदेत गौतम अदानीवर चर्चा नाही होतं. भ्रष्टाचारावर, देशद्रोह्यांवर चर्चा होत नाही आम्ही उभे राहिलो तर आमचा माईक बंद केला जातो. पण पन्नास हजाराच्या बंडलवरून भाजप नौटंकी करत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.