हा देश ईस्ट इंडिया कंपनी(गुजरात) प्राइवेट लिमिटेडच्या बापाचा आहे का? संजय राऊत यांनी फटकारले

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारने राजघाटावर जागा नाकारली. दिल्लीच्या निघमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने संरक्षण विभागाला दिले. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मात्र केंद्र सरकारने काँग्रेसच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवरून एका ओळीत भाजपच व केंद्र सरकारचा समाचार घेतला. हा देश ईस्ट इंडिया कंपनी(गुजरात) प्राइवेट लिमिटेडच्या बापाचा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटरवरून केला आहे.