देशातील सत्तेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून घाणेरडे, गटारी पद्धतीचे पॉलिटिक्स सुरू झाले, असा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. देशात आणि महाराष्ट्रात 70-75 वर्षांपासून राजकारण सुरू आहे, पण या तिघांसारखे घाणेरडे राजकारण कुणी केले नाही, असे संजय राऊत म्हणाले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्पह्टानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेही देशमुख यांचे ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप्स असल्याचा दावा केला होता. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपने आयुष्यभर दुसऱयांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही पह्न टॅप केले होते. ते काम करणाऱया महिला पोलीस अधिकारी निलंबित होणार होत्या, त्यांच्यावर कारवाई होणार होती, पण फडणवीसांनी त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बसवले. अशा फडणवीसांकडून काय अपेक्षा करणार, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
मोदी-शहा आणि फडणवीसांमुळे महाराष्ट्रात गटारी पॉलिटिक्स, संजय राऊत यांचा घणाघात@Sanjayraut #shivsenaubt
वाचा सविस्तर- https://t.co/f5mVW12coO pic.twitter.com/FBNlRmZXtV— Saamana (@SaamanaOnline) July 26, 2024
फडणवीस लोकांचे पह्न टॅप करतात, क्लिप्स बनवतात. इतर पक्षांची माणसे पह्डली असे अभिमानाने सांगतात. असे करणे गृहमंत्र्यांना शोभत नाही असे सांगतानाच, नरेंद्र मोदी जसे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आहेत तसेच राज्याला नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळाले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. फडणवीसांच्या टोळीने महाराष्ट्राचे अधःपतन केले, असेही ते म्हणाले.