
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या क्रौर्याच्या दाव्यांवर बोलताना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काही घडले नव्हते असे वक्तव्य विधानसभेत केले होते. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारले आहे. ”फडणवीस खोटं बोलतायत, धडधडीत पुरावे असतानाही ते खोटं बोलत असतील तर त्यांची गृहमंत्रीपदावर काम करायची मानसिकता नाही”, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारले.
”त्याबाबतीत फडणवीस खोटं बोलयातत. त्यांना चुकीचं ब्रिफींग झालेलं नाही. हे सर्व फोटो, व्हिडीओ त्या क्षणी फडणवीस, अजित पवार, पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिलेले आहेत. ते जर असं बोलले आहेत की हे फोटो पाहिलेले नाही तर ते दिशाभूल करत आहेत. हे फोटो व्हिडीओ आमच्यापर्यंत आले. आरोपपत्रात लावलेले आहेत. तर राज्याचे गृहमंत्री कसं काय ते झटकू शकतात. धड़घधडीत पुरावे असताना ते जर असं बोलत असतील तर ते त्यांची मानसिकता नाही गृ़हमंत्रीपदावर काम करायची”, अशी टीका संजय़ राऊत यांनी केली.
”महाराष्ट्राचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आहे. इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा ते शांत होते. संतोष देशमुख यांना क्रूरपणे, अघोरीपणे मारण्यात आले. मृत्युनंतर त्यांच्या तोंडात लघवी करण्याचा प्रकार केला. किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात धनंजय मुंडे पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये झालं. हे सर्व आरोपी मुंडेंशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे कुणी महात्मा नाहीत हे फडणवीस व अजित दादांना माहित आहे. धनंजय मुंडे कुणी महात्मा नाहीत हे फडणवीस व अजित दादांना माहित आहे. त्यांच्या निवडणूकीत कशा प्रकारे सर्व बूथवर गैरप्रकार झाले ते फडणवीस व अमित शहांनी पाहिले आहेत. तेव्हाच त्यांची निवडणूक रद्द झाली असती तर संतोष देशमुखचे प्राण वाचले असते. आज पोलिसांनी जे फोटो व्हिडीओ समोर आणले त्यावरून महारष्ट्र किती क्रूर झालाय ते दिसतंय. छावा चित्रपटात संभाजी महाराजांच्या बाबतीत औरंगजेबने जे क्रौ्र्य दाखवले तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलीय, असे संजय राऊत म्हणाले.
राजकारण्यांनी त्यांच्या हत्येचा खेळ केला. देवेंद्र फडणवीसांनी चोवीस तासात मुंडेंचा राजीनामा घ्यायल हवा होता. पण ते म्हणालेले कोर्ट ठरवेल. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा घेतला असता. तर फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाल छातीठोकपणे सांगता आलं असतं. आज लोकांचा दबाव आहे व फोटो पाहून मान शरमेने खाली गेल्यानंतर उपरती झाली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत. या राज्याचे मुख्यमंत्री कायदा व न्यायव्यस्थेचे बूज राखत नाही. काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना भ्रष्टाचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. आज पोलीस यंत्रणेचा कायद्यचा दुरुपयोग होतोय. याची टोचणी फडणवीसांना लागायला हवी. या पुढेही वाल्मिक कराडला धनंजय मुंडे वाचवतील, मुंडेंना त्यांच्या सरकारमधील राजकीय आका वाचवतील. राजकीय आका जरी तुम्हाला वाचवत असतील तर जनता तुमच्या छाताडावर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.