Pahalgam Terror Attack – देशावर उपकार करा आणि राजीनामा द्या, संजय राऊत यांचा अमित शहांवर घणाघात

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समजते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ”देशावर उपकार करा आणि राजीनामा द्या”, असा घणाघात संजय राऊत यांनी अमित शहांवर केला आहे.

”राजीनामा द्या. पूर्ण वेळ सरकार बनवण्यात आणि पाडण्यात जातो. राजकारणातील विरोधकांना संपवण्याच्या कटकारस्थानात यांचा मेंदू 365 दिवस व्यस्त असतो. लोकांची सुरक्षा राम भरोसे आहे. आता रामालाही कंटाळा आलाय या लोकांचा. देशावर उपकार करा आणि राजीनामा द्या”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.