हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली राजकीय दलाली आहे, संजय राऊत कडाडले

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत (Delhi) होत आहे. त्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संमेलनाच्या आयोजकांना फटकारले आहे. ”कोणाला कसेही पुरस्कार देताय, यांचा साहित्याशी संबंध काय? हे मराठी साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”हे मराठी साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतायत. कोणचे कसेही सत्कार करतायत. यांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीत दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय. भाजपचा हा उपद्व्याप आहे. इथे मराठीची काय सेवा करणार आहात. महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार करतायत त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

“‘साहित्य संमेलनाला पैशांची कमी असेल. जर त्यांनी अशा पद्धतीने पैसे गोळा करण्यापेक्षा महाराष्ट्राकडे यायचं होतं. मराठी माणसाने लोकवर्गणी करून पैसे दिले असते. शिंद्यांच्या नावाने पुरस्कार विकले गेले आहेत. मराठीचा एवढा घोर अपमान दिल्लीच्या राजकारणात पाहिला नव्हता, असं संजय राऊत म्हणाले.