केंद्रात, राज्यात सरकार तुमचं; पोलीस तुमचे, मग पत्राचं नाटक कशाला? संजय राऊत यांचा रोखठोक सवाल

औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा या क्षणी निरर्थक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हेच सांगितले आहे. आता ही कबर उखडण्या संदर्भात किंवा काही भाजपचे नेते ज्या भूमिका घेत आहेत त्या संदर्भात भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. औरंगजेबाच्या कबरीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक गजेंद्र सिंह मंत्री शेखावत यांना पत्र लिहिल्याच्या प्रश्नावरही राऊत यांनी खरमरीत उत्तर दिले.

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्याची गरज नाही. महाराष्ट्रात त्याचे सरकार आहे. केंद्रामध्येही त्यांचे सरकार आहे. पोलीसही त्यांचेच आहे. कुदळ-फावडी घेऊन जा आणि निर्णय घेऊन टाका. पत्र कशाला द्यायला पाहिजे, ही नाटकबाजी बंद करा, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, बाबरी पाडताना आम्ही कुणाची परवानगी घेतली नव्हती. डोक्याला रुमाल बांधून कारसेवेला निघालेल्या देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर रेल्वे स्थानकावरचा फोटो आम्ही पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने वर्षा बंगल्यातून त्यांनी बाहेर पडाले. रुमाल बांधून, हातात कुदळ-फावडे घेऊन आणि पाच-सहा वीर लोकांना घेऊन त्यांनी तिकडे जावे.

शिवसेनेने अयोध्येतील कलंक नष्ट केला त्यावेळी सांगितलेले की यानंतर आम्ही कोणत्याही मशि‍दीला हात लावणार नाही. अयोध्येत राम मंदीर व्हावे ही आमची भूमिका होती. अयोध्येतील जागेवर आक्रमण झालेले आहे, म्हणून आमची ती लढाई होती. पण सगळ्याच चर्चा, मशिदी आणि कबरीवर असे हातोडे घालता येणार नाहीत. औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचे स्मारक आहे असे आम्ही म्हणतो आणि ते स्मारक उखडायला कुणी निघाले असेल तर ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असेही राऊत म्हणाले.

औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून पत्र्यांवर तारेचे कुंपण

राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. यावरही राऊत यांनी भाष्य केले. सरकारला तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. दादा भूसे यांचा शिक्षणाशी काय संबंध आहे? शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातील तज्ञ असावे लागतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण गेल्या काही वर्षात शिक्षण खात्यावर नेमलेल्या व्यक्तीला ती शिक्षा वाटते, असे राऊत म्हणाले.

पाकिस्तानात केक खाऊन आले, जमीन हडपणाऱ्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना जिलबी-फाफडा खाऊ घातला; भाजपचा केमिकल लोचा काय? – संजय राऊत