बांगलादेशमधली हिंदूंची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पण तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण जबाबदार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारावरून भाजप व मोदी-शहांना फटकारले आहे.
”जगातला किंवा देशातला हिंदू संकटात आहे तो नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपच्या राजकीय स्वार्थामुळे. त्याला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी फूस लावली. देशात निवडणूका जिंकण्यासाठी जी ठिणगी टाकली. त्याचा परिणाम ज्या ज्या भागात हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतोय. नेपाळ, कॅनडामध्ये हल्ले झाले. बांग्लादेश पाकिस्तानमध्ये देखील हिंदूंवर अत्याचार होतायत. याला जबाबदार नरेंद्र मोदींचे निवडणूका जिंकण्यासाठी धोरणं आहेत. हिंदुस्थानात सातत्याने दंगे घडवायचेय, मुसलमानांना टार्गेट करायचं. प्रार्थनास्थळं शोधण्यासाठी खोदकामाला प्रोत्साहन द्यायचं. त्याचा उलटा परिणाम इतर देशातील हिंदूंवर होतोय. नरेंद्र मोदी व भाजप मध्ये इतकी ताकद नाहीए की बांग्लादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील अत्याचार थांबवावतील. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत होते. तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानावर हल्ला चढवला व तिथल्या हिंदूंना संरक्षण दिलं. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगालदेश निर्माण केला. तुमच्यात ती हिंमत आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला व नरेंद्र मोदींना केला.
”काश्मीरी पंडित, मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आणि भाजप हिंदूंच्या नावावर मतं मागते. या देशात सगळ्यात जास्त हिंदूंना धोका कोणापासून असेल तर तो भाजपपासून आहे. साबरमती एक्स्प्रेसला आग कोणी लावली, गोध्रा कोणी केलं. असे अनेक प्रकरणं मला सांगता येतील. कोणी काय केलं कशासाठी केलं. त्याचे परिणाम देश भोगतोय. या देशातली धार्मिक एकता संपली आहे. या देशातली लोकशाही, संविधान संपले आहे. या देशात बटेंगे तो कटेंग, एक है तो सेफ है या घोषमांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली. संपूर्ण देशात दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
राज्यातील सत्तास्थापनेवर बोलताना संजय राऊत यांनी भाजप मिंधेंना फटकारले आहे. ”भाजप जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, मोदींसारखा मजबूत नेता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारखा मजबूत नेता. असे असतानाही एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्र राज्याचं सरकार लटकून पडलं आहे. तुमच्याकडे बहुमत आहे. तुमच्यासोबत अजित पवार आहेत. बहुमत असतानाही पंधरा दिवस शपथ घेत नाही. राज्याला सरकार देत नाही. समर्थक आमदारांची नावं द्यायला तयार नाही. राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलं नाही आणि तुम्ही मांडव घातला. काय प्रकार आहे हा. हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करतायत त्यांना चिरडून टाकतील. ते काही स्वबळावर निवडून आलेले नाही. ते कसे निवडून आले ते भाजपला माहित नाही. एका गृहमंत्रीपदावरून हे सरकार लटकलेलं नाही. अनेक राज्यात भाजपने सरकार बनवली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन मुख्यमंत्री आणले आहेत. वेगळं काही समिकरण आहे का? फडणवीसांच्या जागी कोण येतंय का? उद्या पर्यंत या सर्वाचा उलगडायला हवा नाहीतर आम्ही आमची पुस्तकं उघडू, असे संजय राऊत म्हणाले.
”एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद यासाठी हवंय की त्यांनी याआधी पोलीस यंत्रणा वापरून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. दहशत निर्माण केली. यंत्रणेचा वापर करून त्यांनी निवडणूक लढवली. हीच यंत्रणा वापरून ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात ही त्यांची विकृती आहे. दुसऱ्या क्रमांकाचं खातं गृहखातं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते खातं कायम स्वत:कडे ठेवलेलं आहे. ते नेहमी असे म्हणायचे की गृहखातं उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे द्यायला नको होतं. जर गृहखातं व विधानसभेचं अध्यक्षपद आमच्याकडे असतं तर आमचं सरकार पडलंच नसतं, असं संजय राऊत म्हणाले.