ईश्वराच्या इच्छेपेक्षा संविधानाची इच्छा महत्त्वाची; सरन्यायाधीशांच्या विधानावर संजय राऊतांची टिप्पणी

अयोध्येचा निकाल देताना देवाने मार्ग दाखवला‘, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. खेड तालुक्यातील मूळगावी कनेरसर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. या विधानाची चर्चा सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांनी सरन्यायाधीशांच्या विधानाबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, म्हणूनच सरन्यायाधीशांनी नरेंद्र मोदी यांना आपल्या घरी गणपतीच्या आरतीला बोलावले होते. ते संविधानावर, कायद्याच्या पुस्तकावर विसंबून नसून त्यांना जे साक्षात्कार होतात त्यावर विसंबून राहून ते निर्णय घेत असावेत, असे लोकांच्या मनात येऊ शकते.

ईश्वराची इच्छा काय यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे आहे. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्तीच नसणार. कदाचित विष्णूच्या 13 व्या अवताराची असेल आणि त्या अवताराने त्यांना काय साक्षात्कार दिला असेल म्हणून जर विधानसभेचा कार्यकाळ संपल्यावरही निकाल लांगणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायया तयार आहे. कारण ते विष्णूचे 14 वे अवतार असू शकतात, असा टोला राऊत यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान, संध्याकाळपर्यंत मार्ग निघणार

काय म्हणाले सरन्यायाधीश?

न्यायालयात काम करत असताना कित्येक वेळा अशी प्रकरणे समोर येतात, जी सोडवणे अवघड असते. माझी अशीच काहीशी स्थिती अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना झाली होती. अयोध्या खटल्यावर तीन महिने आम्ही सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकले नव्हते, तेच प्रकरण आमच्यापुढे येऊन ठेपले होते. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा, असा प्रश्न पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली आहे, असे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)