अदानींमुळे मोदींनी देशावर डाग लावला! संजय राऊत यांचा हल्लाबोल

अदानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने लाच व फसवणुकीचे आरोप केले आहेत. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह 7 जणांनी सौर ऊर्जा कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची (2 हजार कोटी रुपये) लाच देऊ केली होती. हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गौतम अदानी आणि सागर अदानींविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने प्रसिद्ध केले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली असून अदानींमुळे मोदींनी देशावर डाग लावला असा हल्लाबोल केला.

गुरुवारी सकाळी माध्यमांनी अमेरिकेतून आलेल्या ब्रेकिंग न्यूजवर विचारले असता राऊत म्हणाले की, अदानींवरती अमेरिकेत वॉरंट निघाले असून याच अदानीसाठी महाराष्ट्र विकायला काढला आहे. ट्रम्प यांनी सूत्र हाती घेताच अदानीविरोधात अटक वॉरंट काढले.

कंत्राट मिळवण्यासाठी 250 मिलियन डॉलर्सची लाच देण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रामध्येही धारावीपासून एअरपोर्टपर्यंत अनेक महत्त्वाची कंत्राटे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून बळकावण्याचा प्रयत्न केला. आम्हीही ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकण्यात आला, असा आरोपही राऊत यांनी केला.

हे वाचा – महाविकास आघाडीला सत्तास्थापनेएवढं बहुमत मिळेल; संजय राऊत यांचा ठाम विश्वास

अदानींविरोधात निघालेने अटक वॉरंट संपूर्ण देश, मोदी आणि भाजपसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अदानींमुळे मोदींनी देशावर डाग लावला. याच अदानीला हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी क्लीन चिट दिली होती. महाराष्ट्रातील निवडणुकीची जी लढाई झाली ती अदानीराष्ट्र होऊ नये म्हणून झाली, असे राऊत म्हणाले.

Gautam Adani – गौतम अदानींवर अमेरिकेमध्ये लाच आणि फसवणूक प्रकरणी आरोप; अटक वॉरंट जारी

धारावीपासून एअरपोर्टपर्यंत सगळे अदानीला विकले. निवडणुकीसाठी 2 हजार कोटींहून अधिक पैसा येथे आला. फडणवीस, शिंदे, अजित पवार, मोदी, शहा यांनी 2 हजार कोटींहून अधिक पैसे खर्च केले. हा संपूर्ण पैसा अदानीचा आहे. हा भ्रष्टाचार, लाच आहे. याच लाचखोरी प्रकरणात अदानीविरोधात अटक वॉरंट जारी झाला ही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा व्यक्तीच्या हातात मोदी देशभरातील उद्योग आणि अर्थव्यवस्था देत आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.

अमेरिकेत मोदींचं राज्य नाही हे अदानी विसरले! प्रशांत भूषण यांचा टोला