दिल्लीतील विधानसभा निवडणूकीचा शनिवारी निकाल लागला. दिल्लीत केजरीवाल यांच्या आपची सत्ता जाऊन भाजपने बहुमत मिळवले आहे. दिल्लीत भाजपला 48 जागा मिळाल्या आहेत तर आपला 22 जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हरयाणात झालेल्या विधानसभा निवडणूकीत देखील भाजपला 48 जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही राज्यांच्या निकालांवर एक पोस्ट शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे.
.हरियाणा में वोटिंग
5 तारीख को गिनती 8 तारीख को भाजपा को सीट आई 48दिल्ली में भी वोटिंग
5 तारीख को गिनती 8 तारीख को भाजपा को सीट आई वही 48
गजब संयोग है! pic.twitter.com/2u6hYbuqEj— Sanjay Raut (@rautsanjay61) February 10, 2025
”हरयाणात मतदान 5 तारखेला व मतमोजणी 8 तारखेला. भाजपने जिंकल्या 48 जागा. दिल्लीत मतदान 5 तारखेला व मतमोजणी 8 तारखेला. पुन्हा भाजपने जिंकल्या 48 जागा. अजब योगायोग आहे”, अशी एक सूचक पोस्ट संजय राऊत यांनी शेअर केली आहे.
हरयाणात 5 ऑक्टोबर 2024 ला विधानसभा निवडणूकीचं मतदान झालं तर दिल्लीत 5 फेब्रुवारी 2025 ला मतदान झालं. हरयाणाचा निकाल 8 ऑक्टोबरला तर दिल्लीचा निकाल 8 फेब्रुवारीला लागला. दोन्ही राज्यात भाजपला 48 जागांवर विजय मिळाला आहे.