जगप्रसिद्ध तबलावाद उस्ताद झाकीर हुसेन यांचे रविवारी रात्री वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतली सॅन फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ”झाकीर हुसेन यांच्या जाण्याने जगाच्या संगीत व कलाक्षेत्राची जबरदस्त हाणी झाली आहे’, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
”झाकीर हुसेन याचं जाणं हे जगाच्या संगीत व कलाक्षेत्राची जबरदस्त हाणी आहे. झाकीरजींचे वडील, भाऊ तौफीक यांनी देशाच्या कलाक्षेत्रात महान कामगिरी बजावली आहे. त्य़ांचं कलाक्षेत्रात मोठं योगदान आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या देशाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. उस्तादजींचा चेहरा हा घरा घरात व मनामनात पोहोलेला चेहरा होता. आमच्या हृदयात त्यांचं स्थान होतं. आज त्याचं निधन देशाबाहेर झालं. त्याचं जाण्याचं वय नव्हतं. त्यांनी आमचं कान आणि मन कायम तृप्त केलं आहे. ही अत्यंत दुर्दैवी व दुखद घटना आहे.