देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. ”देशाच्या तिजोरीत अवघे 16 दिवस पुरेल इतकं महसूल असताना नरसिंहरावांनी अर्थशास्त्राच्या या डॉक्टरच्या हातात देश हातात सोपवला होता. त्यावेळी संकटात सापडलेल्या देशाला आधार देण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
संसदेतलं मनमोहन सिंग यांचं भाषण या देशाने पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी दोन टक्क्यानी घसरेल असं त्यांनी सांगितलं होतं. ही भयंकर गोष्ट आहे, त्याने देश उद्ध्वस्त होईल असे अनेक इशारे त्यांनी दिले व ते खरे ठरले. मनमोहन सिंग हे विकासपुरुष होते, देशाच्या तिजोरीत फक्त 16 दिवस पुरेल इतकच महसूल होते. त्यावेळी नरसिंहरावांनी त्यांच्या हातात देशाचं अर्थखातं दिलं. अर्थशास्त्राच्या या डॉक्टरच्या हातता त्यांनी देश सोपवला होता. नंतर ते प्रधानमंत्री झाले. नरेंद्र मोदी आज जे 85 कोटी गरिबांना फुकट धान्य देतायत. प्रत्येकाच्या घरात चूल पेटते ती योजना मूळ मनमोहन सिंग यांची आहे. अन्न सुरक्षा कायदा त्यांनी आणला. रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा ही योजना देखील मनमोहन सिंग यांचीच. अत्यंत प्रामाणिक सचोटीचा म्हणून त्यांचा बोलबोला होता, असे संजय राऊत म्हणाले.
”मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देश दुखी आहे. मुंबईवर त्यांच विशेष प्रेम होत कारण रिझव्ह्र बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत काम केलं, मुंबईत जी मेट्रो दिसतेय त्याचं श्रेय कुणीही घेऊ द्या पण मी त्याचं श्रेय मनमोहन सिंग यांनाच देईन. मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्न होती ती त्यांनी फार गाजावाजा न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आमचा कायम त्यांच्याशी संवाद राहिला. बाळासाहेबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते त्यांनी कायम टिकवले. जाती धर्माचा द्वेष न करणारा हा नेता होता. त्यांचं जाणं हे दुखकारक आहे. विशेषत: आज देश ज्या परिस्थिती तून आता जात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी मनमोहन सिंग हवे होते. त्यांनी कुणाशीही संवाद तोडला नाही. त्यांनी कुणाशीही संवाद तोडला नाही. 250 च्या वर पत्रकार परिषदा घेतल्या. कोणत्याही पंतप्रधानांनी घेतलेल्या नाहीत. मोदींनी एकही घेतली नाही. कोणत्याही प्रश्नापासून ते पळाले नाहीत. असे मनमोहन सिंग आज आपल्यातून निघून गेले. आताच्या किंवा कोणत्याही पंतप्रधांनांसारखा त्यांचा बडेजाव नव्हता. संसदेच्या लॉबी मध्ये भेटायचे, शिष्टमंडळ भेटायची तेव्हा संवाद साधायचे. असा हा माणूस देवदूत होता. देवाचा माणूस होता, संजय राऊत म्हणाले.