गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले आले तरी शिवसेनेला खतम करता येणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले, चपाटे आले तरी महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) नेते, खासदा संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समाचार घेतला. शनिवारी सकाळी ते माध्यमांशी संवाद साधत होते.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजरातच्या व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसा आणि दहशतीच्या बळावर हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबाडून घेतली. पक्ष, चिन्हही ओरबाडले आणि गद्दारांच्या हातात सोपवले. त्यांना वाटले शिवसेना, शिवसेनेचे नेतृत्व संपेल. पण संकटकाळातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिद्दीने उभे राहिले आणि पक्ष नव्याने उभा करत 9 खासदार वेगळ्या चिन्हावर निवडून आणले. आता आम्ही विधानसभा जिंकण्याच्या दिशेने दमदार पावलं टाकत आहोत, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राज्याची जनता उद्धव ठाकरे यांचा पाठीशी उभी राहिली. जे प्रेम जनतेने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केले, तेच प्रेम उद्धव ठाकरे यांच्यावरही करतात. त्यामुळे गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले, चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाला खतम करता येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅनक्लब चालतो. औरंगजेब फॅनक्लब भाजप आणि गुजरातमध्ये आहे, कारण औरंगजेबाचा जन्म तिथे झाला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि शिवसेना त्याच विचारांनी निर्माण झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. तसेच राज्यभरात शुभेच्छा बॅनरही लागले असून काही बॅनरमधून ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत’ अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ही लोकभावना असून लोकं आपापल्या पद्धतीने ती व्यक्त करतात. त्याविषयी कुणालाही दु:ख वाटण्याचे कारण नाही, असे राऊत म्हणाले.

फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री; संजय राऊत यांना घणाघात

यावेळी त्यांनी महायुतीचाही समाचार घेतला. काही पक्षांमध्ये तीन-तीन, चार-चार नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे सात उमेदवार आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात महाराष्ट्राचे नेतृत्व केले. राज्य, देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवले आणि जीव वाचवले हे लोकं विसरलेले नाहीत. उद्धव ठाकरे संघर्षातून उभे राहिले आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे ते वारंवार उभे राहतात, असेही राऊत यावेळी म्हणाले.