‘नरकातला स्वर्ग’, आर्थर रोड तुरुंगातील अनुभवांवर संजय राऊत यांचे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार आणि दै. सामनाचे कार्यकारी संपादक तीन महिने आर्थर रोड कारागृहात होते. ईडीने संजय राऊत यांना अटक केल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. ईडीविरोधात संजय राऊत यांनी लढा दिला.

तुरुंगातील या अनुभवांवर संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. संजय राऊत यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली हाक जी हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहीजे. त्यामुळे कदाचित त्यालाही हा काळोख दिसू लागेल, अशी प्रतिक्रिया पत्रकार राजू परुळेकर यांनी या पुस्तकाबाबत दिली आहे.