सरकार विरोधकांच्या सूचना ऐकेल का? संसदेत कश्मीर मुद्द्यावर चर्चा करू देतील का? संजय राऊत यांचा सवाल

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचाही समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच केंद्रातील भाजप सरकारने याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी काही सवाल उपस्थित केले आहे.

संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये राऊत म्हणतात की, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत दु:खद आणि निषेधार्ह आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण प्रश्न असा आहे की, सरकार विरोधकांनी केलेल्या सूचना ऐकेल का? ते संसदेमध्ये कश्मीर मुद्द्यावर चर्चा करू देतील का? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.