बॅ. जिना यांनीही इतकं मुस्लिमांचं लांगुलचालन केलं नाही तेवढं गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या भाषणात केलं – संजय राऊत

बॅ. जिना यांनीही इतकं मुस्लिमांचं लांगुलचालन केलं नाही तेवढं गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या भाषणात केलं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच हे विधेयक मंजूर होण्यापूर्वीच मुंबईतल्या वक्फ बोर्डाच्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजपला अजूनही दिवस रात्र पहाटे ओरिजनल शिवसेनेची भीती वाटते. त्यांनी शिवसेना फोडण्याचं जे पाप केलेलं आहे ते त्यांना अजून पचवता आलेलं नाहीये. आम्ही त्यांचं ढोंग आणि त्यांचं पाप सदैव उघडं करत असतो. विधेयक सादर व्हायच्या आधीच महाराष्ट्रामध्ये मुंबई मधल्या वक्फ बोर्डाच्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत. आणि त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी-विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आलं हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडवणीस यांची भीती मी समजू शकतो. आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत. त्यांची भीती जी आहे ती आम्ही समजू शकतो त्यांनी उगाच राष्ट्रीय ऐक्य, हिंदू मुसलमान ऐक्य मुसलमानांचा मसिहा म्हणू नये. काल जर तुम्ही अमित शहांचा भाषण ऐकला असेल तर मुस्लिमांचे इतकं लांगुलचालन बॅरिस्टर जिनाने ओवैसीने आणि शहाबुद्दीनने सुद्धा केलं नसेल. काल त्यांचे भाषण मुस्लिम लांगुनचालनाचा एक अत्यूच्य नमुना होता. फक्त मुस्लिम, फक्त मुस्लिम आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय, आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय आम्हीच मुस्लिमांचे अल्लाह, मुस्लिमांचे पैगंबर आहोत या पद्धतीचे भाषण पाकिस्तानचा निर्माते बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने सुद्धा कधी केला असेल तर मला दाखवावं जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं, याचं कारण दोन लाख कोटीच्या जमिनी आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसने मिळवलेलं तुम्हाला स्वातंत्र्य चालतंय काँग्रेस पक्षाने मिळवलेलं स्वातंत्र्य चालतंय का? तुम्हाला गांधींचं नेतृत्व नेतृत्व चालतं का? असा सवार संजय राऊत यांनी विचारला. तसेच हे मूर्ख आणि भंपक लोक आहेत, ज्यांना जमिनी आणि पैशांशिवाय काही दिसत नाही, त्यांना देश दिसत नाही आणि धर्म दिसत नाही त्यांना देव दिसत नाही असेही संजय राऊत म्हणाले. बिल मंजूर झालं आणि रिक्त झालेल्या जमिनींचे कागद घेऊन पंतप्रधान मोदी परदेशात गेले असतील असेही संजय राऊत म्हणाले. देशभरामध्ये अनेक जमिनींचा सौदा आधीच झालेला आहे. आणि त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्या व्यवहाराला हे वक्फ बोर्डाचं बिल आणलंय आणि मुस्लिमांना आणि हिंदूंना हे लोक मूर्ख समजतात काय? असा सवाल संजय राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे काही बाडगे असतात. ते कधी काँग्रेस पक्षातून आलेले आहेत कधी अन्य पक्षातून आले. आम्ही बोलायला उभं राहिल्यावरती ते पाठीमागून आम्हाला डिस्टर्ब करतात, कारण आम्ही त्यांच्यावर हल्ले करतो. आणि काल बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन एका गटाकडून तशा प्रकारचा एक प्रयत्न होत होता. त्याच्यामुळे मला तो रुद्रावतार आणावा लागला असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

त्यांच्याकडे बहुमत आहे. आणि काल लोकसभेत बिल मंजूर झालं ते 300 पार नाही करू शकलं. ते आकडा किती आहे 283. विरोधी पक्ष एकजुटीने उभा होता भक्कम होता. काही लोक आमचे गैरहजर होते. आमचे शिवसेनेचे अष्टकेकर आजारी आहेत ते हॉस्पिटलला आहेत. त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. ट्रम्पने लावलेल्या टॅरिफरवरून लोकांचं लक्ष विचलित व्हावं .या देशातील महागाई वाढली, बेरोजगारी त्याच्यामुळे उद्योग बंद पडणार आहे. 26 टक्के टेरिफ ट्रम्पनी काल लावलं आणि कालचा दिवस जो टेरिफ लावण्याचा होता तो दिवस त्यांनी हे बिल आणण्याचं दिवसभर मीडियामध्ये बाहेर फक्त याची चर्चा राहावी. ट्रम्पने लावलेल्या टॅरिफची चर्चा होऊ नये यासाठी काल हे बिल आणलं, कालचा दिवस त्यासाठीच निवडला गेला सगळ्यांना माहिती आहे. 26 टक्के टेरिफ लावलेलं आहे, त्याच्यामुळे आज रुपया कोसळला शेअर बाजार कोसळला, अराजक माजलंय अनेक उद्योगांवर, संकट आलेले आहे. ही देशामध्ये ज्या प्रकारचे आर्थिक अराजक माजणार आहे त्याचा हे द्योतक आहे. आणि म्हणून त्या सगळ्यावरचे लक्ष हटवण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणले असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या पाठीलासुद्धा एक असा कणा लावण्याची गरज आहे. शिंदे दिल्लीपुढे वारंवार वाकतात, झुकतात, माना डोलवतात. त्यांना जो मान हलवण्याचा विकार जडलेला आहे, मी त्या आजाराचे नाव घेणार नाही, त्याच्यावर त्यांना उपचाराची गरज आहे. आमच्या मानेचा पट्टा गेला पण तुमच्या गळ्यात जो गुलामगिरीचा दिल्लीचा पट्टा पडलेला आहे त्याच्यावर बोला असे संजय राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाला स्वतःची विचारसरणी नाही. भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी कधीच नव्हता. भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, सरदार पटेल हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हवे असतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा. आणि खास करून जे बाडगे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. आणि त्यांनी समाजात सगळ्या वर्गाला एकत्र करून राज्य स्थापन केलं. हे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मायबाप संघप्रमुखांचे विचार आहेत, त्यांनी जरा ते समजून घ्यावे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.