मोफत जेवण मिळतं म्हणून महाराष्ट्रातले भिकाही शिर्डीत जमा झाले आहेत, असे विधान भाजप नेते सुजय विखेपाटील यांनी केले आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले सर्व भिकारी भाजपमध्ये गेलेत असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच सुजय विखे पाटलांसारखे लोक हे आपला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपच्या दारात भीक मागत आहे अशी टीकाही राऊत यांनी केली.
आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, याचा अर्थ ज्या प्रकारे महाराष्ट्रात मतदान झाले आहे, त्याचा पोलखोल या आमदाराने केला आहे. मतदारांना कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल संविधानाना कोणी गुलाम मानत असेल आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार असे म्हणत असेल तर ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. दोन दोन हजारांना मतदारांना विकत घेतलं आम्ही आणि मतदारांना वेश्या म्हणंण यावर विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांनी यावर मत व्यक्त केले पाहिजे. आम्ही तेच म्हणतोय की मतदारांना विकत घेतलं गेलं.
तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचे सांगितले. या योजनेमुळे राज्य सरकारवर दोन लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. अशा प्रकारच्या योजना कशा ओझं झाल्या आहेत यावर त्यांनी भुमिका मांडली आहे. म्हणजे 1500 रुपये देऊन तुम्ही मतं विकत घेतली. आता सरकारी तिजोरीवर भार टाकणे तुम्हाला जमत नाहीये. तुम्हाला राज्य चालवता येत नाही हे यातून स्पष्ट दिसत आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पालकमंत्रीपदाचे वाटप सोपे नाही. देवेंद्र फडणवीस सारखा माणूस मुख्यमंत्री असताना त्यांना पालकमंत्रीपद वाटता येत नाही. खातेवाटपही लवकर जाहीर झालं नाही. 26 जानेवारी जवळ येत आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्याला मानवंदना घ्यावी लागते. पण अद्याप पालकमंत्रीपदाचे वाटप होऊ शकले नाही. कुणालाही पालकमंत्रीपद दिले तरी धुसफूस सुरूच राहणार असे संजय राऊत म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणूक एक आखाडा झाला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली आहे. समोर अरविंद केजरीवाल हे 15 वर्ष सत्तेत असून भाजप दिल्लीच्या सत्तेसाठी आतूर झाली आहे. जर पंतप्रधान मोदी महिलांचा सन्मान करत असतील तर वादग्रस्त विधान करण्यारा बिधूडी यांना भाजपने निवडणुकीपासून दूर केले पाहिजे तर आम्ही मान्य करू की पंतप्रधान मोदी हे संस्कारी आहेत. आणि ते आपल्या पक्षाला संस्कारक्षम बनवू पाहतात असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच जसे सगळे भ्रष्टाचारी भीका मागत जसे भाजपच्या दारात आहेत आधी ते भिकारी थांबवा. आमच्याकडून, राष्ट्रवादीतून, काँग्रेसमधून सर्व भिकारी भाजपमध्ये गेले आहेत. शिर्डीत भिकारी जेवणासाठी येत असतील तर महाराष्ट्रात योग्य कारभार होत नाहिये आणि विखे पाटलांसरखे लोक आपला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपच्या दारात भीक मागत आहेत. हे सर्व लोक भिकारी आहेत असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.