मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना वेश्या म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी अशा आमदाराचा राजीनामा घ्यावा असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
आज मुंबईत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिंदे गटाचे जे आमदार आहेत. त्यांचे विधान मी अधिक गंभीर मानतो. या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मतदारांना कोणी वेश्या म्हणत असेल तर त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असे आव्हान दिले.
तसेच तुम्हाला मतदार वेश्या वाटतात. त्यांचे मतदान तुम्ही पैसै देऊन विकत घेतले असेल. कोणी मतदारांना वेश्या म्हणत आहेत. तर अजित पवार म्हणाले की मी काय सालगडी आहे का? हे कसलं फ्रस्टेशन? हे समजून घेऊदे या राज्याला असेही संजय राऊत म्हणाले.