आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीची आज सर्व मराठी वृत्तपत्रांत जाहिरात छापण्यात आली होती. पण या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोच नव्हता. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर या जाहिरातीचा फोटो शेअर केला आहे. तसेच एकनाथ शिंदे ऊठसुठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरतात.पण या प्रमुख जाहिरातीत साहेबांचा फोटो का नाही? हे विचारण्याची हिंमत नाही अशी टीका केली आहे.
एकनाथ शिंदे ऊठसुठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरतात.
पण या प्रमुख जाहिरातीत साहेबांचा फोटो का नाही? हे विचारण्याची हिंमत नाही. pic.twitter.com/oxdoBEeQzd— Sanjay Raut (@rautsanjay61) December 5, 2024