
आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर होणार आहे. पण हे विधेयक म्हणजे भाजपची गोंधळ निर्माण करण्याची खाज आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच काँग्रेसने पाकिस्तानची फाळणी करून दोन तुकडे केले होते तेवढा भाजमध्ये दम आहे का असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
एक्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर देत संजय राऊत म्हणाले की देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा, त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र जी,
वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही,
ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची!
विषय राहुल गांधींचा ,
त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता!
तुमच्यात हा दम आहे?
बोला । https://t.co/YRkjEyTQDT— Sanjay Raut (@rautsanjay61) April 2, 2025