पंतप्रधान मोदींनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले आहे, संजय राऊत यांचा घणाघात

भाजपने सर्वाधिक अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा केला आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले आहे, त्या कबरीला कुणीच हात लावू शकत नाही असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जास्तीत जास्त अपमान करण्याचं काम गेल्या काही काळामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. त्याचे शिरोमणी हे मिस्टर अमित शहा आहेत. ते काय प्रायश्चित घ्यायला चालले आहेत ? का बहुतेक ते प्रायश्चित घ्यायला चाललेले आहेत. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून सगळ्यात जास्त अपमान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यांनी या सगळ्यांचा अपमान या लोकांनी केलेला आहे. आणि त्यांना परत त्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम सुद्धा महाराष्ट्रातल्या सरकारने केले आहे. त्याचं प्रायश्चित घ्यायला जर अमित शाही येत असतील तर महाराष्ट्र त्यांच्या दौऱ्याकडे तटस्थपणे पहा असे संजय राऊत म्हणाले.

एखादं प्रकरण खोटं करायचंच ठरवलं तर खोटी माणसं, खोट्या कथा रचणं, त्यासाठी भाजपने पडद्यामागून ताकद देणं वकील पुरवणं, वकीलाला पैसे पुरवणं याचिकाकर्त्यांना पैसे देणं या सगळ्या गोष्टी गेल्या 10 वर्षात होत आहेत. त्यापैकी दिशा सालियनची याचिका आहे. योगवेळी आम्ही याचं बिंग फोडू. आम्ही मजा घेत आहोत कुठे काय चाललंय. कुठे भेटीगाठी होत आहेत. कोण कुणाला फोन करतंय. फक्त मुख्यमंत्रीच विरोधकांचे फोन ऐकतात असे नाही. आमच्याही काही यंत्रणा आहेत. आमच्या मागे जे षडयंत्र उभं केलं जातंय त्याच्या मागे काय काय चाललंय याची माहिती विरोधी पक्षाकडेही असते असेही संजय राऊत म्हणाले.

औरंगजेबाच्या कबरीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण दिले आहे. जोपर्यंत मोदी आणि अमित शाह आहेत तोपर्यंत औरंगजेबाच्या कबरीला कोणीच हात लावू शकत नाही. ना एकनाथ शिंदे ना त्यांचे लोक असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.