हिंजवडीत 100 जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे होते. या बेरोजदार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भजी तळायला सांगणार का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदर संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील बेरोजगारीसंदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हिंजवडीतील बेरोजगार तरुणांना पंतप्रधा मोदी भजी तळायला सांगणार का? बेरोजगारीवरून संजय राऊत यांचा सवाल महाराष्ट्रातले हजारो तरुण तरुणी बेरोजगार आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोजगार वाढवण्यासाठी दावोसला जाऊन परकीय गुंतवणूक आणत आहेत.
तसेच राज्यातल्या बेरोजगारीसंदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे. एका हिंजवडीत पाच ते साडे सहा हजार पदवीधर तरुण हे आयटीक्षेत्रात नोकरीसाठी चेंगराचेंगरी करत उभे आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात की यांनी भजी तळावी. या साडे पाच हजार तरुणांना भजी तळायला सांगणार का? हिंजवडीतलं हे अत्यंत विदारक चित्र आहे, असेही संजय राऊत म्हणाले.