महाराष्ट्रात 2 हजार कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. एसटी महामंडळामध्ये झालेल्या घोटाळा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले या दोघांनी मिळून केला, असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत यांनी केला.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एसटी बसच्या घोटाळ्यावर भाष्य केलं. महाराष्ट्रात 2 हजार कोटींचा एसटी घोटाळा झाला आहे. आणि आता तो उघड झाला आहे. हा घोटाळा एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनीच केला आहे. त्यामुळे यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्राची तिजोरी लुटण्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. EOW ने तपास केला पाहिजे. आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे. बघूया ईडी काय करतयं, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.