मोदी-शहांमुळे महाराष्ट्र असुरक्षित, त्यासाठी भाजपला हाकलून लावायचे आहे; संजय राऊत यांचा निर्धार

मोदी-शहांमुळे महाराष्ट्र असुरक्षित आहे. महाराष्ट्रात आम्ही सेफ आहोत आणि जास्त सेफ व्हायचंय म्हणून आम्हाला भाजपला इथून काढायचं आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेतल्या आमच्या लोकांना मोदींनीच वेगळं केलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदी आणि शहांनी वेगळं केलं. आपण काय बोलतोय हे आधी मोदी आणि शहांनी समजून घ्यावं. शिवसेनेतून आमचं कुटुंब फोडण्याचं काम मोदी शहांनी केलंय. 23 तारखेनंतर मोदी शहांनी सेफ रहावं. बटेंगे तो कटेंगे हे विधान महाराष्ट्रातल्या लोकांनी फेकून दिलं. आता एक हो तो सेफ है अशी घोषणा दिली आहे. मोदी शहांना अशी विधानं का करावी लागतात. या राज्यातली या देशातली जनता तुमची नाही का? महाराष्ट्रात आम्ही सेफ आहोत आणि जास्त सेफ व्हायचंय म्हणून आम्हाला भाजपला इथून काढायचं आहे. मोदी शहा महाराष्ट्रात आल्याने आम्ही अनसेफ होऊन जातो. मोदी शहा महाराष्ट्रात आल्यावर दंगलीसाठी भडकावतात.

तसेच मोदी काहीही म्हणू शकतात, त्यांचा म्हणणाल्या आगा पिछा नसतो. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मुख्यमंत्री हे दहशतवाद्याला सुरक्षा देतात. भाजपने गुंड जमा केले आहेत. काही गुंडांना तुरुंगातच काम दिले असून त्यांना मोबाईल फोन पुरवण्यात आले आहेत. हे गुंड आपापल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सूचना देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महाराष्ट्राची घाण करून ठेवली आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.