निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये घोटाळा, अमित शहा सूत्रधार; संजय राऊत यांचा आरोप

भारतीय जनता पक्ष पराभवाच्या खाईत आहे. मतदार, जनता भाजप विरोधात गेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप मतदार याद्यांमध्ये घोटाळे करायला लागला आहे. या घोटाळ्याचे सूत्रधार अमित शहा आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप ज्या मतदारसंघात लढणार आहे त्या साधारण 150 मतदारसंघात ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले असे त्यांना वाटत आहे ती 10 हजार नावे डिलिट करून त्या बदल्यात 10 हजार बोगस नावे टाकली जात आहे. खोटी आधारकार्ड, ओळखपत्र या माध्यमातून भाजप स्वत: लढणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात 10 हजार नावे डिलिट करत आहे. मतदारयादीतून लोकशाहीतील सगळ्यात मोठा घोटाळा होत आहे. हरण्याच्या भीतीने निवडणूक आयोग भाजपला अशा प्रकारे मदत करत असेल तर या देशातील लोकशाही राहिलेली नाही.

निवडणूक आयोग गृहमंत्रालाच्या अखत्यारीत येतो. म्हणजे अमित शहा या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे चार प्रमुख नेते मतदार यादी घोटाळ्याचे प्रमुख आहेत. त्यामधील एका व्यक्तीला आताच राज्यपालनियुक्त आमदार केले आहे, तो या सगळ्याचा सूत्रधार आहे. आम्ही मतदारांना जागरूक करू, प्रसंगी रस्त्यावर उतरू, निवडणूक आयोगावर चाल करू जाऊ. तुम्हाला अशा प्रकारे निवडणुका जिंकता येणार नाही. मर्द असाल तर लोकशाही मार्गाने आमच्यासमोर उभे रहा आणि निवडणूक जिंकून दाखवा, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले.

ते पुढे म्हणाले कीस, चंद्रशेखर बावनकुळे या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार आहेत. हा घोटाळा कसा करावा आणि कसा केला जावा यासाठी त्यांनी नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचे एक विशेष शिबिर घेतले. मतदार यादीतून 10 हजार नावे कशी वगळायची आणि आपली कशी घालायची याचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येऊ नये म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून पुढली तयारी केली आहे.

हे वाचा – CM पदाचा चेहरा जाहीर करायला महायुती घाबरते; काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचे कारस्थान

20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल आणि 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करायचे आहे. एवढा कमी वेळ दिला जात नाही. 23 ला मतमोजणी असून पूर्ण निकाल लागेपर्यंत 24 चाकीथ उजाडणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जिंकलेले आमदार इथे येतील. त्यांना अजून एक दिवस लागेल. 26 तारखेला बैठका घेणे, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणे, राज्यपालांकडे दावा करणे यासाठी किमान वेळ लागतो तो दिलेला नाही. 26 तारखेपर्यंत सरकार बनवू शकले नाहीत, म्हणून 6 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावण्याचे कारस्थान अमित शहा यांचे आहे, असा आरोप राऊत यांनी केली.

Maharashtra election 2024 – शिवसेना नेत्यांची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, संजय राऊत यांनी दिली माहिती

अमित शहा महाराष्ट्राचे नंबर एक शत्रू

कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचे सरकार बनू द्यायचे नाही. सूरत, अहमदाबाद, गुवाहाटीला ज्यांनी कांड केले त्यांच्या हातात राज्य रहावे यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच लावायची. म्हणून फक्त दोन दिवसांचा कालावधी सरकार बनवायला दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार झालेला नाही, तो अमित शहा करताहेत. ते महाराष्ट्राचे नंबर एक शत्रू आहेत. शिंदे-फडणवीस-अजित पवार हे महाराष्ट्राच्या दुष्मनांचे हस्तक, मांडलिक आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)