संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

new-rbi-governor-revenue-secretary-sanjay-malhotra

केंद्रीय अर्थ मंत्रालयातील महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर बनले आहेत. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाल मंगळवारी संपणार आहे. मल्होत्रा हे दास यांची जागा घेणार असून बुधवारी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.