![sanjay-jadhav](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/04/sanjay-jadhav-696x447.jpg)
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन चालणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मागील काही वर्षांत अनेक चढउतार पाहिले आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्यांची काय अवस्था होत आहे, ते आपण आज राज्याच्या राजकारणात पाहत आहोतच, असे शिवसेना खासदार संजय (बंडु) जाधव म्हणाले. मंठा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नगरसेवक प्रदीप बोराडे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट चषकाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवार रोजी ते बोलत होते.
यावेळी व्यासीठावर विश्वनाथअप्पा बोराडे, कयूम कुरेशी, शिराज पठाण, मुसा कुरेशी, शबाब कुरेशी, ज्ञानेश्वर सरकटे, संजय नागरे, आबासाहेब कदम, आसाराम बोराडे, कबीर तांबोळी, बाळू बोराडे, शेख एजाज, गणेशराव शहाणे, दत्तराव हातकडके, श्याम टाके, राहुल वानखेडे, नीलेश जोजारे, गणेश गणगे, सचिन चव्हाण, कृष्णा हेलसर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मंठा टी पॉइंट ते देवी रोडवरील क्रिकेट मैदानापर्यंत मोटारसायकल रॅली काढून करण्यात आली.
पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले की, खरा शिवसैनिक हा लढवय्या आहे. पक्षावर कितीही हल्ले झाले तरी शिवसेना पक्ष मजबूत असल्याचे कारण म्हणजे स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणाराच खरा शिवसैनिक असतो. त्यामुळे शिवसेनेनेच मोठे केलेल्या तालुक्यातील काहींनी शिवसेना सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षांशी घरोबा केला आहे. पण, अशा स्वार्थी लोकांनी पक्ष सोडला म्हणून शिवसेना थांबणार नाही तर उलट शिवसैनिक नव्या उमेदीने कामाला लागेल. यासाठी आपण नगरसेवक प्रदीप बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भविष्यात प्रदीप बोराडे यांनाॉ सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी बोलताना शेवटी दिला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी संजय बोराडे, रवि काळे, राहुल बोराडे, इम्रान पठाण, सच्चिन चव्हाण, शेख इलू, जुनेद पठाण, शेख रियाज, शेख जब्बार, रामेश्वर बोराडे, शंकर कचरे यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गणगे यांनी केले.
शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवणार
कडवा शिवसैनिक कधीच कोणासमोर झुकत नसतो. हे मंठा तालुक्यातील शिवसैनिकांनी मागील तीस वर्षांपासून सातत्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे मंठा तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक प्रदीप बोराडे यांनी सांगितले