
पालिकेच्या अखत्यारीत काम करणाऱ्या 29 हजार 618 सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्या, रिक्त 39 हजार जागा भरा, दुप्पट झालेल्या भत्त्यांच्या भरपाईची थकबाकी 2016 पासून द्या, भांडवली खर्चाच्या नावाखाली होणारी पालिकेची लूट थांबवा आदी प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कामगारांचा उद्या 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता प्रचंड मोर्चा आझाद मैदानात काढण्यात येणार आहे.
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सफाई कामगार काम करीत असतात, मात्र या सफाई कामगारांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना म्युनिसिपल मजदूर युनियनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सफाई कामगारांसह सर्व खात्यांमधील कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक मोठय़ा संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.
अशा आहेत इतर मागण्या
z सर्वसामान्यांवर कोणत्याही नव्या कराचा बोजा लादू नये.
z 29,618 सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्या.
z विविध खात्यांमध्ये रिक्त झालेल्या 71 हजार जागा भरा.
z सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वारसांना नोकरी द्या.
z जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.
z गटविमामधील चार ग्रुप रद्द करून समान सवलती द्या.