
फेब्रुवारी महिना संपायला अजून आठवडा शिल्लक असतानाच मे महिन्यासारख्या कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. अशातच राज्यात आज उष्माघाताने पहिला बळी घेतला. सांगलीतील हिराबाग कॉर्नर येथे गारेगार विव्रेता रामपाल याला अचानक उष्माघातामुळे भोवळ आली. त्यानंतर रक्ताच्या उलटय़ा झाल्या आणि जागीच मृत्यू झाला. राज्यात पाऱ्याने पस्तीशी ओलांडली असून सोलापुरात पारा 38 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे.