काश्मिरात संगमनेरचे जवान रामदास बढे शहीद

जम्मू-कश्मिरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावताना हिंदुस्थानी लष्कराचे जवान रामदास साहेबराव बढे हे शहीद झाले. ते संगमनेर तालुक्यातील मेंढवणचे रहिवासी हेते. शहीद जवान रामदास बढे यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा-मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, संपूर्ण संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान रामदास बढे यांच्या पार्थिवावर उद्या (दि. 26) त्यांच्या मुळगावी मेंढवण येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

जम्मू-काश्मीरातील जंगव्वार सेक्टरमध्ये सीमेवर ऑपरेशनल ड्युटी करत असताना हवालदार जवान रामदास बढे यांना वीरमरण आले. उद्या सकाळी मेंढवण गावी त्यांचे पार्थिव आणण्यात येईल. लष्कराच्या वतीने मानवंदना दिली जणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.