संगमनेरमध्ये बालविवाहाची घटना उघड, अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या तरुणासह कुटुंबियांवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यातील खळी या गावात एका पंधरा वर्षीय बालिकेचा बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्या मुलासह त्याचे आई वडिल, अल्पवयीन मुलीचे आई वडील व लग्न लावणाऱ्या पुरोहितावर गुन्हा दाखल कररण्यात आला आहे.

अरविंद दत्तू घुगे याचा पानोडी येथील रहिवाशी कल्पना गणेश नागरे व गणेश सखाराम नागरे यांच्या मुलीशी 10 मे रोजी येथे विवाह खळी गावात पार पडला. याची खबर त्या बालिकेच्या नातेवाईकाला लागताच त्याने या घटनेची माहिती खळी येथील ग्रामसेवक अनिल माधव वाणी यांच्याकडे दिली आणि त्यांना लग्नाचे फोटो व इतर पुरावे सादर केले. त्यानंतर खळी गावातील बालविवाह समिती सदस्य मच्छिंद्र पाराजी चकोर, पोलीस पाटील) राधिका दिगंबर घुगे, अंगणवाडी सेविका) विलास गजानन वाघमारे, सरपंच) राजेंद्र नामदेव चकोर, उपसरपंच) कल्पना रवींद्र अंधोरे (बालविकास प्रकल्प प्रभारी अधिकारी संगमनेर) यांनी या सर्व प्रकरणाची खात्री करून घेतली व मुलीच्या पालकांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी आम्ही फक्त साखरपुडा केला असून लग्न नंतर करणार असल्याचे सांगितले. परंतु उपलब्ध पुरावे, फोटो आणि इतर कागदपत्रानुसार ग्रामसेवक अनिल माधव वाणी यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्याने सर्व आरोपीं विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नवरा मुलगा अरविंद दत्तू घुगे, मुलाचे आई वडिल – मंदा दत्तू घुगे, दत्तू सुखदेव घुगे, मुलीचे आई वडिल कल्पना गणेश नागरे व गणेश सखाराम नागरे आणि पांडुरंग भानुदास दिमोटे (पुरोहित) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.